आली दिवाळी मंगलदायी Aali Diwali Mangaldayi Lyrics – Diwali Songs in Marathi

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी
चला चला ग, जमुनि मैत्रिणी
गुंफु या विविध फुले मधुनी
हार तोरणे गजरे माळा लौकरी
चला, चला, फुले आणा,
आनंद झाला घरोघरी
रेखोनी रांगोळी अंगणि या
फुले चौफुले रंगी भरुया
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी
चला चला त्वरा करा,
आनंद झाला घरोघरी
अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किति तरी !
चला चला पहा तरी,
आनंद झाला घरोघरी
हाति सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी
आणा आणा निरंजना,
आनंद झाला घरोघरी

close