आईचा जोगवा Aaicha Jogwa Lyrics – Anaadi Nirgun Pragatali Bhavani

Aaicha Jogwa Lyrics आईचा जोगवा जोगवा मागेन Lyrics :  जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे

आईचा जोगवा Aaicha Jogwa Lyrics

आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन

अनादी निर्गुणी प्रगटली भवानी ।
मोह महिषासूर मर्दनालागूनी ।
विविध तपाची करावयाची झाडणी ।
भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन

नवविध भक्तीच्या करुन नवरात्रा ।
करूणा पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ सासर्‍या सांडीन कुपात्रा ॥३॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन मी कुर्वंडी ।
अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

आता साजनी झाले मी निसंग ।
विकल्प नवर्‍याचा सोडियला, संग ।
कामक्रोध हे झोडियले मांग ।
केला मोकळा मार्ग सुरुंग ॥५॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी नवस महाद्वारी फेडिला ।
एकपणे जनार्दन देखियला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन |

close