छंद तुझा लागला Chhand Tuza Lagla – Devi Bhakti Geet
छंद तुझा लागला ,गअंबे मला नाद तुझा लागला ग ।
रत्नांचा चुडा आई ,रत्नांचा चुडा।
कशाने तडकला ,ग राती बाई झांजेचा भार पडला ।
हिरवी गार चोळी अंबा हिरवी गर चोळी ।
कशाने ओली झाली ,ग राती बाई पालखीला भुज दिली ।
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
सरज्याची नथ अंबा ,सरज्याची नथ ।
कशाने ओली झाली ,ग अंबा राती पेल्याने दुध प्याली ।
बुट्टेदार शालू अंबा ,बुट्टेदार शालू।
कशाने मिळविला ,ग राती बाई परशूला खेळवीला ।
सव्वा खंडी उद ,सव्वा खंडी कपूर ।
कैलासी धुर गेला ,ग आईने माझ्या आराधी गुरु केला ।