Hey Sundara Lyrics हे सुंदरा हे सुंदरा

Hey Sundara Lyrics from Tu hi Re Marathi Movie. The song is sung by Adarsh Shinde, composed by Shashank Powar while lyrics are penned by Prof. Kuntinath Karke.

Song  – Sundara
Movie – Tu hi Re
Music – Shashank Powar
Lyrics – Prof. Kuntinath Karke
Singer – Adarsh Shinde
Music Label : Video Palace


हे सुंदरा

जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद
भरजरी शालू अंजीरी, मदन मंजिरी, फिरे स्वच्छंद
रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा…
हे सुंदरा….

गजगजीत कोवळी काया की बाभळ तरणी ताठी
तू नटून थटून येता, उठतात वादळे मोठी
नजरेचे मारुनी तीर, कैकास करी घायाळ
तू पोर द्वाड मुलखाची, लई अवखळ धीट खट्याळ
सुंदरा असावी कशी..
सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी, वेणीमधे गजरा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..

छबीदार सुंदरी नटी, उभी एकटी, हळदीचा रंग
चवदार कवळी काकडी, दिसे फाकडी, चवळीची शेंग
कमरेत जरा…
कमरेत जरा बारीक, जशी खारीक, गोडवा न्यारा हा न्यारा

डोळ्यात शराबी नशा…
डोळ्यात शराबी नशा, गालावर उषा, तोंडलं ओठी
चपळाक हरणीची गती..
चपळाक हरणीची गती, नार गुणवती, सांडलं मोती
ही गोड पेरूची फोड
ही गोड पेरूची फोड, लावते वेड, प्रीतीचा वारा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..

Leave a Comment

close