मकर संक्रांति 2020 – Makar Sankranti 2020

मकर संक्रांति पूजा मुहूर्त –

शुभ मुहूर्त : ७ : १५ ते १२ : ३० (कालावधी: ५ तास १४ मिनिटे )

मकरसंक्रांत :

हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

तिळवण व बोरन्हाण :

नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांति ला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते.

लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे सुद्धा घातले जाता. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते..

भोगी :

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगाभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.

मकर संक्रांतीचे महत्व :

संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. यावर्षी संक्रांतीचे वाहन ‘गर्दभ’ असणार आहे. यावर्षी सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनेचा काळ सुरू होतो. या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापना, गृहनिर्मिती, यज्ञ-कर्म आदी पुण्यकर्मे केली जातात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या या पुण्यकाळात दानधर्मालाही महत्व आहे. संक्रांती गर्दभवर विराजमान होऊन, गुलाबी वस्त्र धारण करून, मिठाईचे सेवन करत दक्षिण पासून पश्चिम दिशेला जाईल.

संक्रांत सण तीन दिवस साजरा करतात. यावर्षी भोगी १४ जानेवारी या तारखेला आहे. यंदा संक्रांत १५ जानेवारी ला साजरी केली जाणार आहे. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडूल वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.
मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. व मकरसंक्राती चा सण साजरी करतात

Leave a Comment

close