Marathi ukhane for female: Presenting you the list of Marathi ukhane for bride in marathi font. Marathi ukhana is poetic term to announce or take the name of husband or groom in marathi.
Marathi Ukhane for Female
आकाश्यात उड़णाऱ्या राजहंसाचे काळे नीळे डोळे
…….. रावांचे मन माझ्या हृदयात फिरे
आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा
…….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा
कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
…….. रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर.
इंग्लीश मध्ये गवताला म्हणतात ग्रास
…….. रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास
दही, दूध, तूप आणि लोणी…
…….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी
मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,
शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण
पण हळुच सांगते कानात,
…….. राव आहेत माझे जीव की प्राण.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
…….. रावांचा नाव घेते सात जन्मासाठी
तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना
…….. रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.
मंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण
…….. रावांचे नाव घायला …….. च कारण
तांब्याच्या पळीवर नागाची खून,
…….. रावांचा नाव घेते…….. ची सून.
Marathi Ukhana for bride
आई वडीलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात..
हसतमुखाने प्रवेश केला मी …….. रावांच्या जीवनात.
नीलवरणी आकाशात शोभते चंद्राची कोर
…….. राव सारखे पती मिळाला भाग्य लागतं थोर.
बकुळीची फुले सुकली तरी हरवत नाही गंध ……..
…….. रावासाठी माहेर सोडले तरी राहतील मनात स्म्रुतिबंध
पेटी वाजे तबला वाजे मंजुळ वाजे बासरी
…….. रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी
तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण,
…….. नाव घेते …….. ची सून
बागेत फूल गुलाबाचे
माझ्या मनात नाव …….. रावांचे .
दिन दुबळ्याचे गहाणे परमेश्वराने ऐकावे
…….. रावानं सारखे पती मिळाले आणखी काय मागावे
आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक
…….. रावांचे नाव घेते …….. ची लेक
चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात,
…….. रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात.
कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा
भाळी कुंकुम टिळा रेखीते…….. रावांच्या नावाचा
सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन
…….. रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण
पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
…….. रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां करिता
पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड,
तिन्ही सांजेला मनाला लागे …….. रावांची ओढ.
एका वर्षात महिने असतात बारा,
…….. रावांच्या नावातच सामावलं आहे आनंद माझा सारा.
आपुलकी असेल तर जीवन सुदंर
संदेशाची आवड असेल तर मोबाइल सुंदर
फुले असेल तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल तर चेहरा सुंदर
…….. रावांनबरोबर च सगळी नाती मनापासुन जपते म्हणुन सासर सुंदर
लेक लाडकी कुणाची, आईबापाची
सुन कुणाची, सासू सासरे ची
राणी कुणाची …….. रावांची
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
…….. राव गेले कामाला म्हणून मला नाही करमत
रंगीत कपाटात जापानी बाहुली,
…….. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली
मुबई ते पुणे पेरला होता लसून,
…….. राव गेले थकून, आणा त्यांना पालाखित बसून.
खोक्यात खोका टिव्ही चा खोका,
गप्प बसा नाहीतर देईन ठोसा
बागेत फूल गुलाबाचे,
माझ्या मनात नाम …….. रावांचे
सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,
…….. रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा
चांदीचे ताट त्यात जेवायचा जावयाचा थाट
…….. रावांचे नाव घ्यायला लागतात रूपए तिनशे साठ
नदीला आला पूर समुद्राची झाली भरती
…….. राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती
मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला
…….. रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला ……..
खुर्चीत खुर्ची अन् …….. रावांची
बहीण लवंगी मिर्ची
केळी देते सोलून पेरू देते चिरून,
…….. स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन.
लसणात लसून गावरान लसून ……..
रावांची राणी म्हणते मी …….. ची सुन
परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा,
…….. रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा..
तांदळाच्या भाकरीवर अंड्याचा पोळा
…….. रावांच्या शेजारणीवर डोळा
ताज महल बनविताना कारागीर होते कुशल
…….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
…….. रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……..
आणि …….. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..
मोहिनी माझं नाव येवला माझं गाव
…….. रावांच नाव घेते पाटील माझं आडनाव.
तुलसी माते तुलसी माते वन्दन करते तुला,
…….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहुदे मला.
नवरात्रित लावते अखंड दिवा
…….. रावांसाठी नेहमीच करत राहीन सेवा.
नवरात्रीच्या नऊ माळा, दहावी माळ म्हणजे दसरा
…….. रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा.
मोगऱ्याचा गजरा लावते मी वेणीला
…….. रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला.
छोट्याश्या वाटीत घास भरवे बाळाला,
…….. रावांचे नाव घेताना लाज कसली जिवाला
जीवनाच्या सागरात पती पत्नी ची नौका
…….. रावांच नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका
कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज,
…….. रावांचे नाव घेते, वटपोर्णिमा आहे आज.
महादेवाच्या मंदिरात बेल वाहते वाकून
…….. रावांच नाव घेते तुमचा मान राखून
लाल मणि तोडले काळे मणि जोडले
…….. रावांनसाठी आई वडिल सोडले
पीडयावर पीडे पाच पिडे
…….. रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे
केंद्रात केंद्र दूध केद्र
माझ्या नशिबात पडलं हे काळ चुचुंदर
ताटभर दगिन्यांपेक्षा माणस असावी घरभर,
…….. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर
सागरात सरिता जीवनात ज्योती
…….. राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती
लहान मुले असतात खुप गोजिरवाणी,
…….. राव माझे संग्राम अन मि त्यांची देवयानी
गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,
…….. राव दिसतात कृष्णा सारखे सावळे
येत होती जात होती, घडाळ्यात पाहत होती,
घडाळ्यात वाजले एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक.
माणित मणी काळे मणी
…….. राव माझ्या मनाचे धनी
घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,
…….. रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस
केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन,
…….. रावांचे नाव घेते …….. ची सून.
कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,
…….. राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.
अंगणातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी,
आधी होते आई वडीलांची तान्ही आता झाले…….. रावांची राणी
बसली होती दारात, नजर गेली आकाशात ……..
…….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात
रिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात
…….. रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.
प्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण
…….. रावांच्या हृदयात अमृताची साठवण
फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे
…….. रावांच्या सुखात माझे सुख असावे.
नात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस,
…….. राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस.
एक दिवस अचानक आला एक घोडेस्वार
श्वेत रंगी घोड्यावर …….. रावच होते ते जादूगार
सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा मधुर स्वर
दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.
सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म …….. राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.
खाण तशी माती …….. राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
साजुक तुपाच्या करते पुरया, टाकते पाट करते ताट
…….. राव बसले जेवायला समया लावते तिनशे साठ
विटावर विटा सात विटा
…….. रावांनच नाव घेते सगळी आता फुटा
पानोपानी फुल फुलावे, त्यात गहीरे रंग भरावे,
…….. रावांच्या प्रेमळ सहवासात अस्तित्व मी माझे विसरावे