Rampaat Song lyrics from upcoming Marathi movie Rampaat by Ravi Jadhav. Starring Abhinay Berde as Mithoon, Kashmira Pardesi.
Movie: Rampaat
Music:
Lyrics:
Singer(s):
Music on:
Rampaat Song Lyrics:
ये भावड्या ऐक ना बे
मराठी रॅप हा बे
हा घालणार राडा उडेल तुझा थरकाप ना बे
संताप हा रे, होईल तुझाच ना रे, जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शॉट ना रे
किती आले, किती गेले कोणाच्या आलो नाय हाताने
घाम सांडून,कला मांडून,आलो स्वतःशी मी भांडून
केली मेहनत, बनलो मेहनती, केली उन्नती, केली प्रगती, अशी घेतली गती मनाची,
वाढवली श्रीमंती!
जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी
जर का ठरवलं काही करू मुलं नादखुळी
डोक्याला शॉट नाय बाकी हे निवांत हाय
नडला जर का आम्हा तर भावा व्हणार दंगल नाय
आलो म्होरं आम्ही पोरं अंगी बळ आहे जोर
बनू थोर बोली गोड मेहनतीची त्याला जोड
स्वप्नंं केली पूर्ण काढल्यात जागून राती
आता जगणं माझं फक्त मराठीत गाजण्यासाठी
रंपाट लय रंपाट
बिंधास मराठी पोरं ही रंपाट
रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट
जपली मराठी संस्कृती,जोडली नाती, माती ख्याती विसरून जाती पाती महाराष्ट्राची ही कीर्ती सांगू किती,येईल भरती,प्रेम करतो भाषेवर्ती जपतो माणुसकी मराठी सांगतो नवशाहीर
अभिमानाने,ज्ञानाने लहान मोठ्या थोराने ऐक तुझ्या कानाने रंपाट या पोराने केला धुरळा,आत शिरला,पुरून उरला मर्द गडी,भाषेत गोडी घेतली रंपाट उडी बघ कशी भुरर
तांबडा पांढरा व्हढला हाय
रांगडा मी भिडलो हाय
घाटी मी मराठी म्हणून लेका मी तर रंपाट हाय
कालचा मी आज नाय
स्वप्नं जगतोय सत्त्यात काय
मागून बोलणारे हे आज बोलतायत
अगं आय आय
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
प्रवाहाच्या विरोधात भावा पव्हलोय मी
आणली ती स्थिती आधी माझी कधी नव्हती
येऊदेत कितीपण अडचणी माझ्या म्होरं हसून मी बोलेन त्यांना काय चालतंय की
रंपाट लय रंपाट
बिंधास मराठी पोरं ही रंपाट
रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..