Timepass 2 (TP2) | Sunya Sunya Manamadhye Lyrics सुन्या सुन्या मनामध्ये… सूर हलके

Song:  Sunya Sunya Manamadhye Lyrics
Movie: Timepass 2 (TP2)
Singers : Ketaki Mategaonkar & Adarsh Shinde
Music by – Chinar & Mahesh
Lyrics – Mangesh Kangane
Music on: Video Palace

 

शेतीबागा माडाची गं वाडी 
नवरीला घुंगराची गाडी 
जशी राजा रानीची गं जोडी 
नवरीला चांदण्याची साडी 

सुन्या सुन्या मनामध्ये… सूर हलके 
नव्या जुन्या आठवणी… भास परके 
दारी सनईचे सूर… दाटे मनी हूर हूर 
चाले विरहाचा पुढे वारसा… 

फुलमाळा मंडपाच्या दारी 
झालारीना सुखाच्या किनारी 
नवी नाती ओळखीची सारी 
सपनांची दुनिया गं न्यारी 

भावनेची तोरणे… वेदनेच्या झालारी 
नाद करिती चौघडे… वाढते घुसमट उरी 
ओळखीचे चेहेरे… मी अनामिक एकटी 
संपले सारे दुवे… अन आस ही सरली 
गाव माझा दूर आला आसवांचा पूर 
प्रेम नव्याने देई यातना… 

हळदीने सजली गं काया 
सासरची मिळेल गं माया 
वेड लावी धन्याची गं भेट 
डोळ्यातल्या काजळाची तीट 

आठवांचे कुंचले… रेखिती काटेकुटे 
कोरडे तळहात हे… मेंदीची वर जळमटे 
मोकळ्या माथ्यावरी… देवळाची पायरी 
फितूर झाली दैवते…रीत ही कुठली 
दैव मानी हार आली बंधनाला धार 
भोवती निराशेचा उडे पाचोळा 

शेतीबागा माडाची गं वाडी 
नवरीला घुंगराची गाडी 
जशी राजा रानीची गं जोडी 
नवरीला चांदण्याची साडी 

Leave a Comment

close