राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे,
ताऱ्याकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱया,
त्यातुनी होती चोऱया
दारास नाही दोऱया,
या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला,
‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला,
या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने,
कंदील शामदाने
आम्हा जमीन माने,
या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या,
जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा,
या झोपडीत माझ्या॥६॥
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
पाहुन सौख्य माझे,
देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे,
या झोपडीत माझ्या॥७॥
__ संत तुकडोजी महाराज
या व्यतिरिक्त आणखी मराठी कविता संग्रह वाचण्यासाठी इथे भेट द्या.