Ganesh Chaturthi 2023: श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते.

गणेश श्लोक / गणपती श्लोक
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.
गणपतीची जन्मकथा Ganesh Chaturthi 2023
एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्यााने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्याशचे शिरच उडवले.
प्राणप्रतिष्ठाण पूजा Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.(उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस, जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात.धोत-याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात.
’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।
श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वजर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.
गणेशोत्सव Ganeshotsav 2023
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकजागृती करून घेण्यासाठी या उत्सवाचा प्रभावीपणे अवलंब करण्यात आला महाराष्ट्रात या सार्वजनिक गणेशोत्सवाला खूप मोठी लोकप्रियता लाभली. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच़े आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच़े आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते,व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.
श्रीगणेशव्रतांची माहिती Shri Ganesh Vrat
(१) वैशाखीपौर्णिमा, (२) भाद्रपद शुक्ल चतुर्थी (३) माघ शुक्ल चतुर्थी. गणेशव्रतें अनेक असलीं, तरी काही प्रचलित व्रतांची उपयुक्त माहिती येथें थोडक्यात देत आहे.
Ganesh Chaturthi 2023 Ganpati Aarati Sangrah /Stotra / Mantra / Chalisa / Songs
- सुखकर्ता दुखहर्ता Sukhakarta Dukhaharta Aarati
- श्री गणपतीस्तोत्र – Shri Ganpati Stotra
- श्रीगणेशव्रतांची माहिती Shri Ganesh Vrat
- विनायक चतुर्थी व्रत Shri Vinayak Chaturthi Vrat
- या रे या सारे या Ya Re Ya Sare Ya
- अष्टविनायका तुझा महिमा कसा Ashtavinayaka Tuza Mahima Kasa
- सूर निरागस हो Sur Niragas Ho
- देवा हो देवा Deva Ho Deva Lyrics
- गणाध्यक्ष पहिला Ganadhyaksh Pahila
- जय देवा Jai Deva
- जय गणेश जय गणेश / Jay Ganesh Jay Ganesh Aarti
- शेंदूर लाल चढायो Shendur Laal Chadhayo Aarati
- नाना परिमळ दुर्वा Nana Parimal Durva Aarti
- उठा उठा हो सकळीक Utha Utha Ho Saklik
- कर्पूरगौर Karpur Aarti
अष्टविनायक गणपती Ashtavinayak Ganpati
Ganesh Chaturthi 2023 अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.
- मोरगांव (मयुरेश्वर)
- थेऊर (चिंतामणी)
- सिद्धटेक (सिद्धिविनायक)
- रांजणगाव (महागणपती)
- ओझर (विघ्नेश्वर)
- लेण्याद्री (गिरिजात्मज)
- महड (वरदविनायक)
- पाली (बल्लाळेश्वर)