Lyrics: Dasu Vaidya
Singer: Mangesh Dhakade, Kirti Killedar
Music Label: Zee Music Marathi
मनी अचानक हलले काही Mani Achanak Halale Kahi Lyrics
मनी अचानक हलले काही
वाऱ्यावर दरवळले काही
भरती येता उधाणलेली
लाट आतुनी शहारलेली
सावरताना ढळले काही
गंध दिवाणा स्पर्श पाहुणा
हवा कशाला नवा बहाणा
नजरेमधूनी कळले काही
तू असण्याचा धुंद केवडा
तू नसताना दिवस बापुडा
शब्दांमधूनी ओघळले काही
हात हाती या विश्वासाचा
अर्थ सांगतो सहवासाचा
सखे सोबती आकळले काही
