मांजराच्या गळ्यात घंटा | Manjarachya Galyat Ghanta | Marathi Moral Stories For Kids

एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.

हा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.

सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.

सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुषारीचा फार अभिमान वाटला.

तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.

उपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो.

Click here to read more Marathi Moral Stories

बासरीवाला आणि गावकरी | Basariwala ani Gaavkari | Marathi Moral Stories For Kids

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.

ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.
त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्यामागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात. आणि पाण्यात बुडून मरतात..

बासरीवाला गावकर्‍यांना आपली बिदागी मागतो. मात्र, गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकर्‍यांची लबाडी कळून येते.
तो म्हणतो ठिक आहे, आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.

गावकर्‍यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.

उपदेश: उपकार करणार्‍याशी कृतघ्न वागू नये.

Click here to read more Marathi Moral Stories

लहान मुलांसाठी छान-छान गोष्टी इथे वाचा | Read Marathi Moral Stories for Kids Online

लहान मुलांसाठी पंचतंत्र आणि इसापनीतीच्या बोध आणि उपदेश देणाऱ्या छान-छान गोष्टी इथे वाचा. जर आपल्याला या गोष्टी आवडल्या तर खालील शेअर बटन वापरून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला देखील या गोष्टी पाठवू शकता.

Read Stories here

 

 

हुशार बेडूक Hushar Bedook | Marathi Moral Stories for kids

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात कि तलावात त्यांना न आवडणारा एक बेढब प्राणी आहे.

राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो कि त्या बेढब प्राण्याला मारून टाका. तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वांच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृध्द शिपाई सांगतो कि ‘त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल.’ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले मला पाण्यात फेकू नका नाहीतर मी मरून जाईन.’

बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते ‘या मूर्ख लोकांना माहित नाही कि, मी पाण्यात किती सुरक्षित आहे.’

तात्पर्य- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ.

Click here to read more Marathi Moral Stories

close