आनंद हरपला… Aanand Harpala Lyrics – Dharmaveer

Aanand Harpala lyrics from Dharmveer Marathi Movie by Pravin Tarde. Anand Harpla Song Lyrics by Mangesh kangane, Music by Chinar-Mahesh and Sung by Saurabh Salunke. Starring Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye

Movie – Dharmaveer
Singer – Saurabh Salunke
Music – Chinar – Mahesh
Lyricist – Mangesh Kangane
Music on – Zee Music Marathi

आनंद हरपला…

मुखात सुखाची साखर ठेवून
जोडली जन्माची नाती
रामाच्या रुपात जपला माणूस
मारुतीरायाची छाती

वाघाची लीला नि कपाळी टिळा
तू उजेड अंधारासाठी
भनक भीतीची नव्हती भवती
आभाळ रे माझ्या पाठी
देऊन किनारा मनाच्या होडीचा
सारंग हरवला..

माझा आनंद हरपला…

नाराज नशीब घेऊन एखादा
जन्माला आलेला कुणी
पडली नजर तुझी ज्याच्यावर
अखंड राहिला ऋणी…

विसर पडावा घडू नये कधी
जिव्हारी जिवंत जाण
दारात तुळस कौलारू कळस
देव्हाऱ्यात तुझा मान…
दिनांचा देव्हारा सोडून मोकळा
श्रीरंग परतला..
माझा आनंद हरपला… ||१||

देऊन कान तू ऐकली गाऱ्हाणी
सदैव देवाच्या आधी
सवाल छळतो आता मी कुणाला
दाखवू नवस यादी…

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

वार सणवार रेखीव रांगोळी
दारात सजेल जेव्हा
वादळ होऊन तुझी आठवण
दाटून येईल तेव्हा..
घराघरातला उंच थरातला
गोविंद हरवला..
माझा आनंद हरपला… ||२||

वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
विझला तेजाचा दिवा
असाच उजेड देणारा दिवा
तो आणील कुठून नवा

येतील जातील देणारे हात
तू तिथेही उजवा देवा
गाय-गरीबाची बात नको
तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा
देऊन भरारी आभाळा पल्याड
पतंग सरकला..
माझा आनंद हरपला… ||३||

close