माझी पंढरीची माय Majhi Pandharichi Maay Lyrics – Mauli – Ajay-Atul

Majhi Pandharichi Maay Lyrics from Mauli marathi movie. Song composed by Ajay-Atul, Lyrics by Guru Thakur and Sung by Ajay Gogavale. Starring Ritesh Deshmukh and Saiyami Kher.

Movie: Mauli
Music: Ajay Atul
Lyrics: Guru Thaakur & Ajay Gogavale
Singer: Ajay Gogavale
Backing vocals Male : Umesh Joshi,Swapnil Godbole, Vijay Dhuri, Jitendra Tupe, Janardan Dhatrak, Mayur Sukale, Padmanabh Gaikwad, Abhishek Marotkar, Dhaval Chandvadkar, Prasenjeet Kosambi,
Backing vocals female : Priyanka Barve, Saee Tembhekar, Sharayu Date, Shamika Bhide, Swapnaja Lele, Yogieeta Godboley, Saily Panse, Aanandi Joshi, Anagha Palsule, Sonali Karnik
Music on: Jio Studios, Mumbai Film Company

Majhi Pandharichi Maay Lyrics


पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
हरीनामे झंकार विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

तू बाप तूच बंधू
तू सखा रे तुच त्राता रे
भूतली या पाठीराखा
तूच आता
अंधार यातनेचा
भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावूनी ये
तूच आता

होऊन सावली हाकेस धावली
तुजवीण माऊली जगू कैसे
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे

करकटावरी ठेवोनी
ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय ,
माझी पंढरीची माय

साजिरे स्वरूप सुंदर
तानभूक हारपून जाय
माझी पंढरीची माय ,
माझी पंढरीची माय

ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे
तनमनात झरली गाथा

तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या
मी तुलाच मिरविन आता

लोचनात त्रिभूवन आवघे
लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय,
माझी पंढरीची माय

अंतरा –
संपू दे गा मोह मनीचा
वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या
वीट देवा व्हावी हो

कळस नको सोनियाचा
पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी
ओंजळी भरावी हो

भाबडा भाव अर्पिला
उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले
चित्त हे तुझीया दारी हो

विझल्या मनातली दिपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे
‘मी’ तुज्यात विरता माझी
राहीलीच ओळख काय
माझी पंढरीची माय
माझी पंढरीची माय

मी पणाच सोडून जाता
या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय
माझी पंढरीची माय

पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
भक्तीचा उद्गार विठ्ठल

अंतरा २
अंतरी मिळे पंढरी ..
सावळा हरी ..भेटला तेथ
बोलला कुठे शोधीशी..
मला दशदिशी ..तुझ्या मी आत

जाहलो धन्य ..ना कुणी अन्य ..
सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण ..
लागले ध्यान.. उघडली ताटी

ना उरली भवभयिंचता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे
तनमनात झरली गाथा

Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now

GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023

Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx

Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L

Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo

हेऽऽऽऽऽऽ ‘मी’ तुज्यात विरता माझी
राहीलीच ओळख काय
माझी पंढरीची माय
माझी पंढरीची माय

मी पणाच सोडून जाता
या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय
माझी पंढरीची माय

माऊली माऊली माऊली
माऊली माऊली
माऊली माऊली माऊली
माऊली माऊली
माऊली माऊली
माऊली माऊली
माऊली माऊली रुप तुझे

close