शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.
आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
देवीची गाणी – आरती, जोगवा, स्तोत्र, गोंधळ आणि चित्रपट गीत
– गोंधळ
– बया दार उघड – आदिशक्ती भवानी स्तोत्र
– करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता
नवरात्रोत्सव आणि व्रत
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.
कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असतॆ, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते.
जोगवा
जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥
त्रिविध तापांची कराया झाडणी ।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन ।
भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥
या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.
नवरात्रातील नऊ माळा
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.
पहिली माळ
शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
तिसरी माळ
निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.
चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात..
सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ
तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ
कुंकुमार्चन करतात.
नवरात्रातील नऊ रंग
२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतही ही संकल्पना महिलांनी स्वीकारलेली दिसते. उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या संकल्पनेतून दिसून येतात. ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने बहुसंख्य सामान्य आणि नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.
२०19 सालचे रंग
२९ सप्टेंबर २०१९ – भगवा
३० सप्टेबर २०१९ – पांढरा
१ ऑक्टोबर २०१९ – लाल
२ ऑक्टोबर २०१९ – निळा
३ ऑक्टोबर २०१९ – पिवळा
४ ऑक्टोबर २०१९ – हिरवा
५ ऑक्टोबर २०१९ – राखाडी
६ ऑक्टोबर २०१९ – जांभळा
७ ऑक्टोबर २०१९ – मोरपंखी