Nilkanth Master (2015) | Partun Ye Na Lyrics परतून ये ना

Song: Partun Ye na Lyrics

Movie: Nilkanth Master
Music: Ajay-Atul
Lyrics: Gajendra Ahire
Singer: Javed Ali, Shreya Ghoshal

सुटला ठाव ये ना तुटला गाव ये ना
सुटला ठाव ये ना तुटला गाव ये ना
टीचल्या काळजाचा सलतो घाव ये ना 
सरे मधुमास ये ना पुरे वनवास ये ना 
सरे मधुमास ये ना पुरे वनवास ये ना 
अंधारून आला नभ ओला परतून ये ना 
अंधारून आला नभ ओला परतून ये ना

मेंदीच्या हाताने तू सडा अंगणाला दिला
सये तुझ्या पावलांनी मातीला सुगंध आला
मेंदीच्या हाताने तू सडा अंगणाला दिला
सये तुझ्या पावलांनी मातीला सुगंध आला
ओल्या हळदीच्या हाती केशरी शेरा
सांज ही उदास ये ना दिन हे भकास ये ना 
पापणीच्या पाकळ्यांचा जळतो सुवास ये ना

सरे मधुमास ये ना पुरे वनवास ये ना 
सरे मधुमास ये ना पुरे वनवास ये ना 
अंधारून आला नभ ओला परतून ये ना 
अंधारून आला नभ ओला परतून ये ना

सांज वेळी कौतुकाने लाव तुळशीला दिवा 
गाभार्यात अंधाराच्या जन्म घेई सुर्य नवा
सांज वेळी कौतुकाने लाव तुळशीला दिवा 
गाभार्यात अंधाराच्या जन्म घेई सुर्य नवा
चांद तुझ्या डोळ्यातल्या आभाळाला दे ना 
थिजला श्वास ये ना विजला भास ये ना
सुटला धीर तरी उरली आस ये ना

सरे मधुमास ये ना पुरे वनवास ये ना 
सरे मधुमास ये ना पुरे वनवास ये ना 
अंधारून आला नभ ओला परतून ये ना 
अंधारून आला नभ ओला परतून ये ना

Leave a Comment

close