नंदाचं ह्ये कारटं Nandacha He Kaarata Lyrics – BASTA – Santosh Mulekar

Nandacha He Kaarata Lyrics from Marathi Movie Basta. Starring Sayali Sanjeev and Akshay Taksale.

Movie: Basta
Music: Santosh Mulekar
Lyrics: Mangesh Kangane, Shankar Sheth (Nana) Pawar
Singer(s): Nagesh Morvekar
Music on: SGMF Music

Nandacha He Kaarata Song Lyrics:

गावभर उगा ह्ये करतंय दंगा
जमवून पोरं-टोरं..
काढतंय खोड्या नि मारतंय उड्या
धावतंय म्होरं म्होरं..
निळं जांभळं दिसतंय काळं
नंदाचं ह्ये कारटं..
नंदाचं ह्ये.. नंदाचं ह्ये.. नंदाचं ह्ये कारटं..

घागर घेउनी पानीयासी जाता
ब घ रे सा.. सा रे ग प..
ब घ रे सा.. सा रे ग प..
घागर घेउनी पानीयासी जाता
झुलवितो बोलून बाता..
दही दुध घेऊन मथुरेसी जाता
अडवितो आमच्या वाटा
बाई गं फोडीतो.. फोडीतो आमच्या माठा
अगं आये आये आये..
अगं बाये बाये बाये..
फोडीतो आमच्या माठा
वाटतंय गुणी चाखतंय लोणी
लपून ह्ये चोरटं..
नंदाचं ह्ये.. नंदाचं ह्ये.. नंदाचं ह्ये कारटं..
निळं जांभळं दिसतंय काळं
नंदाचं ह्ये कारटं..
नंदाचं ह्ये.. नंदाचं ह्ये.. नंदाचं ह्ये कारटं..

फूल झुलत्या येलीचं Ful Zultya Yelicha Lyrics – BASTA – Ajay Gogavale

Ful zultya Yelicha Lyrics from Marathi Movie Basta. Phul Zulatya Velicha song composed by Santosh Mulekar, Lyrics by Mangesh Kangane and Sung by Ajay Gogavale and Dipali Sathe. Starring Sayali Sanjeev and Akshay Taksale.

Movie: Basta
Music: Santosh Mulekar
Lyrics: Mangesh Kangane
Singer(s): Ajay Gogavale and Dipali Sathe
Music on: SGMF Music

Ful Zultya Yelicha Lyrics

फुल झुलत्या येलीचं
रंग चोरतंया लालीचं
हसु कवळ्या गालीचं..
लयकारी.. रं..

नको आवतान फरमानं
नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची..
लय भारी.. गं..

दिस डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा…

आज घडीभर भेटीनं
सारं बिलकुल नवं निराळं..
फुल हळुवार पिरतीचं
मनामंदी जनू फुलून आलं..

उलगडतंय कोडं सुटतंय.. झाला असर हा संगतीचा..
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा… !!१!!

भान हरवून एकटं
वाऱ्यावानी कधी उनाड व्हावं..
दिस नवा जीणं येगळं
जीव उधळून झिम्माड व्हावं..
तो
मन झुरतंय हाल करतंय.. खेळ असा गोड गमतीचा..
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा… !!२!!

Ful Zultya Yelicha Song Lyrics

close