Ne majasi ne parat matrubhumila Sagara Pran Talmalala with lyrics sung by Lata Mangeshkar, Usha Mangeshkar, Usha Mangeshkar & PT. Hridaynath Mangeshkar from the album Jai Jai Maharashtra Majha
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उद्धरणी । मी येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती गुण-सुमनें मी वेचियली या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या भुलविणें व्यर्थ हें आता । रे बहु जिवलग गमतें चित्ता । रे तुज सरित्पते ! जी सरिता । रे त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा? त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी तरि आंग्लभूमी-भयभीता । रे अबला न माझिही माता । रे कथिल हें अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला
He Hindu Nrasinha Prabho Shivaji Raja lyrics by Swatantryaveer Sawarkar, Music by Pt. Hridaynath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar.
Music: Pt. Hrudaynath Mangeshkar Lyrics: Swatantryaveer Sawarkar Singer: Lata Mangeshkar Music on: SAREGAMA Marathi
He Hindu Nrasinha Prabho Shivaji Raja lyrics in Marathi
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरण तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा
Jaydev Jai Jai Shivraya Aarti Lyrics by Swatantryaveer Sawarkar, Music by Pt. Hridaynath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar.
Music: Pt. Hrudaynath Mangeshkar Lyrics: Swatantryaveer Sawarkar Singer: Lata Mangeshkar
Jaydev Jai Jai Shivraya Aarti Lyrics in Marathi
जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया
श्रीजगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जयदेव जयदेव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
Presenting the Gomu Sangatin Lyrics from upcoming Marathi Movie Ani…Dr. Kashinath Ghanekar. Song sung by Asha Bhosale and Hemant Kumar, while composed by Pt. Hridaynath Mangeshkar & Lyrics penned by Sudhir Moghe. Starring Subodh Bhave, Sonali Kulkarni, Sumeet Raghavan.
Movie : Ani…Dr. Kashinath Ghanekar
Music : Pt. Hridaynath Mangeshkar
Lyrics: Sudhir Moghe
Singers: Asha Bhosale, Hemant Kumar
Music Label: Saregama Marathi
Gomu Sangatina Lyrics
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय
गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालीज भोळं, त्यात मासोली झालं
माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा,
जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार …… हाय
Gomu sangatin majhya tu yeshil kai?
majhya pirtichi raani tu hoshil kai?
aar sangatin tujhya mi yenar nay
tujhya pirtichi rani mi honar nay
ga tujh tapor dol, jas kolyach jal
majh kalich bhol, tyach masoli jhal
majhya piticha sutlay tufaan vara vara vara
ra nag davus bhaltach tora
ja ra gumaan salsood chora
tujhya najarachya jadula ashhi me bhoolnar nay
Gomu sangatin majhya tu yeshil kai?
aar sangatin tujhya mi yenar…hay
केव्हा तरी पहाटे Kevha Tari Pahate Lyrics from Nivdung marathi movie. Kevha Tari Pahaate Song Lyrics by Suresh Bhat, Sung by Asha Bhosle and Composed by Pt. Hridaynath Mangeshkar.
Movie: Nivdung (1989) Music: Pt. Hridaynath Mangeshkar Lyrics: Suresh Bhat Singer(s): Asha Bhosle Music on:
Kevha Tari Pahate Lyrics
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा फसवून रात गेली कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात गेली
उरले उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली
Aaj Gokulat Rang Khelato Hari song composed by Pt. Hrudaynath Mangeshkar, while lyrics penned by Suresh Bhat and sung by Lata Mangeshkar. Enjoy Evergreen Marathi Song along with lyrics.
Aaj Gokulat Rang Khelato Hari Lyrics
आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून, रंगूनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
सांग श्याम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील काय तू तरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
त्या तिथे अनंगरंग रास रंगला गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला तो पहा मृदुंग मंजिर्यात वाजला हाय वाजली फिरुन तीच बासरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
God Gojiri Laj Lajri Lyrics from Dharmakanya movie. Song composed by Pt. Hridaynath Mangeshakr, while Lyrics penned by P Savlaram and Sung by Usha Mangeshkar and Krushna Kale. Film Starring Anupama, Chandrakant Gokhale, Ratnamala, Vasant Shinde and Raj Shekhar.
Movie: Dharmakanya (1968)
Music: Pt. Hrudaynath Mangeshkar
Lyrics: P Savlaram
Singer: Usha Mangeshkar, Krushna Kalle