ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला | Ne Majasi Ne Parat Matrubhumila

Ne majasi ne parat matrubhumila Sagara Pran Talmalala with lyrics sung by Lata Mangeshkar, Usha Mangeshkar, Usha Mangeshkar & PT. Hridaynath Mangeshkar from the album Jai Jai Maharashtra Majha

Song: Sagara Pran Talmalala
Album: Jai Jai Maharashtra Majha
Artist: Lata Mangeshkar, Meena Mangeshkar, Usha Mangeshkar & PT. Hridaynath Mangeshkar
Music Director: PT. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Vinayakrao Savarkar

Ne Majasi Ne Parat Matrubhumila Lyrics

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते ! जी सरिता । रे
त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

Sung by Lata Mangeshkar

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे Jayostute Shrimahanmangale

Music: Madhukar Golvalkar
Lyrics: Swatantryaveer Savarkar
Singer(s): Lata Mangeshkar

Jayostute Shrimahanmangale

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं, नीति-संपदांची
स्वतंत्रते भगवति । श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली
तूं सूर्याचें तेज, उदधिचें गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होतें
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम रक्तरंजिते । सुजन पूजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन तुजवीण जनन तें मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

अनादि मी अनंत मी Anadi mi Anant mi

Music: Sudhir Phadke
Lyrics: SWATANTRYAVEER SAVARKAR
Singer(s): Sudhir Phadke

Anadi mi Anant mi

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥

अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळाऽ रिपूऽ । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ॥

लोटि हिंस्त्र सिंहाच्या पंजरीं मला
नम्र दाससम चाटिल मम पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाऽहलाऽ । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ! ॥

close