
अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.
1. मोरगांव (मयुरेश्वर)
मोरगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. येथे मयुरेश्वराचे मंदिर आहे. हे गाव कर्हा३ नदी किनारी वसलेले आहे.
पुण्यापासून मोरगाव हे ६७ की.मी.अंतरावर आहे तर बारामतीपासून ३९ की.मी.अंतरावर आहे.
2. थेऊर (चिंतामणी)
थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे.येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे.थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो.
3. सिद्धटेक (सिद्धिविनायक)
सिद्धटेक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे.
भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात अष्टविनायकांपैकी एक सिद्धविनायकाचे देऊळ आहे. हे गाव राज्यमार्ग क्र. ६७ वर आहे.
4. रांजणगाव (महागणपती)
महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
5. ओझर (विघ्नेश्वर)
ओझर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.
6. लेण्याद्री (गिरिजात्मज)
लेण्याद्री (गिरिजात्मज) लेणी क्रमांक ७ हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. पुणे जिल्ह्यातील गणपतीचे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात ३० लेण्या आहेत, त्यातील ७ व्या लेणीत गिरिजात्मकाचे मंदिर आहे.
7. महड (वरदविनायक)
महड हे अष्टविनायकां पैकी असलेले वरदविनायक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महड गाव जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खालापूर तालुक्यात खोपोलीपासून ६ किमी अंतरावर आहे. रायगड किल्ले पासून जवळच आहे हे ठिकाण
8. पाली (बल्लाळेश्वर)
पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे.