Here is the list of first standard balbhrati Marathi Gaani. Chandomama, Ye re Ye re Pavasa, Din Din Diwali and Vithucha Gajar. Read your childhood poems or Marathi gaani. Don’t forgot to share with your friend and family.
- Chandomama
- Ye Re Ye Re Pavasa
- Din Din Diwali
- Vithucha Gajar
Chandomama Lyrics | Marathi Gaani
चांदोमामा चांदोमामा हसतोस का?
ढगामागे जाऊन लपतोस का?
हळूच ढगामागून बघतोस का?
लपाछ्पी छ्पाछ्पी खेळतोस का?
चांदोमामा चांदोमामा रुसतोस का?
एक दिवस दडी मारून बसतोस का?
काळा काळा अंधार करतोस का?
थकून भागून निजतोस का?
Ye re Ye re Pausa Lyrics | Marathi Gaani
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
ये रे ये रे पावसा
तुला देऊ पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा ||१||
पाऊस पडला झिम झिम झिम
अंगण झाले ओले चिंब
पाऊस पडला मुसळधार
रान झाले हिरवेगार ||२||
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून ||३||
Din Din Diwali Lyrics | Marathi Gaani
दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा?
आई बापांचा
दे माय खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत,
घालीन काठी
Vithucha Gajar Lyrics | Marathi Gaani
विठूचा, गजर हरिनामाचा
झेंडा रोविला ||१||
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी
डाव मांडिला ||२||
विटीदांडू आणि लगोऱ्या चेंडू
डाव मांडिला ||३||
आट्यापाट्या आणि हुतुतू गोट्या
डाव मांडिला ||४||