कशाला उद्याची बात Kashala Udyachi Baat Lyrics | Star Pravah

 
कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे
निळेनिळे घन ओले कुठे कसे वळले
उधाण लाटा कुठे निघाल्या सोडुनी किनारे
नशीब माझे फिरून वेडे तुझ्यापाशी आले
नवीन हा रस्ता मला हवी तुझी साथ
जगू दे आजचे कशाला उद्याची बात ?
जिथेजिथे नेशील तू, तिथेतिथे येईन मी
ऊन कालचे पुसुनी पाऊसगाणे गाईन मी
जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात
जगू दे आजचे कशाला उद्याची बात ?
नको जाऊ तू दूर मनी उठे काहूर
सावली ही स्पर्षाची सोबतीस हे सूर
इतके सुंदर स्वप्‍न हवेसे, हवी हीच रात
जगू दे आजचे कशाला उद्याची बात ?

Leave a Comment

close