किती सांगू मी सांगू कुणाला Kiti Sangu Mi Sangu Kunala Lyrics

किती सांगू मी सांगू कुणाला Kiti Sangu Mi Sangu Kunala Lyrics

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, ओठांवरी बासरी, भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपाळकाला

खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
लपुनछपुन गिरिधारी, मारतो ग पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला

close