Naach Ga Ghuma Song Lyrics from Marathi movie Girlz. Starring Ankita Lande, Ketaki Narayan, Anvita Phaltankar, Parth Bhalerao.
Movie: Girlz
Music: Samir Saptiskar
Lyrics: Abhijeet Gaikwad
Singer : Avadhoot Gupte
Music on: Everest Marathi
Naach Ga Ghuma Song Lyrics:
नाच गं घुमा
सखे तुझ्या हाती पाळण्याची दोरी
जगासि तूच उद्धारी,
मोडुन दे रीती, कशाची भीती?
घुमू दे उंच ललकारी।
स्वत:ची हो गुरू, मागे नको फिरू
ओलांड तू गं उंबरा;
होऊ नको उदास, घे मोकळा हा श्वास
वारा बांधून पायाला…।।
नाच गं घुमा, कशी मी नाचू?
नाच गं घुमा, गो माजे बाय! ।।धृ०।।
निर्दोष-दोषी ठरवेल कोण इथे सारेच फसवे
धीर धरुनी कर तू प्रवास आहेस तू तुझ्या सवे
अवघड हेच क्षण, जाऊ नको खचून
इथे लागेल कस जरा
सापडेल तुला वाट, होईल उद्या पहाट
भिऊ नकोस अंधारा
नाच गं घुमा… कशी मी नाचू.. नाच गं घुमा गं माझे बाय।।१।।
फाडून दे तू खोटे मुखवटे पुढे नको हा वारसा,
पोकळ या साऱ्या ढोंगी जगाला
दाखव आज आरसा
सोसू नकोस हाल,अशी तोऱ्यात चाल
झुकू दे त्यांच्या नजरा
काट्याकुट्याची वाट,हो चालण्या तयार
आता खोचून पदरा
नाच गं घुमा कशी मी नाचू…नाच गं घुमा गं माझे बाय।।2।।