माझी आई अक्कलकोटी Majhi Aai Akkalkoti Lyrics

माझी आई अक्कलकोटी

माझी आई अक्कलकोटी
भिवू नका ती आहे पाठी llधृ ll

जिचे आजानुबाहू रुप
ती पूर्ण ब्रम्हस्वरुप
तिच्या चरणी लागे सुख l
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll

गाणगापुरी घे विसावा
आली अक्कलकोटी गावा
मनी संदेह तो नसावा
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll

आदिमाया शक्ती आई
तिच्या पाठीमागे गाई
ती वटवृक्षा ठायी l
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll

जिच्या चरणी ज्यांचा भाव
तो रंक असो वा राव
तेथे राहे हो दृढभाव
माझी आई अक्कलकोटी
भिऊ नका ती आहे पाठी ll

close