जुळून येती रेशीमगाठी Julun Yeti Reshimgaathi | Zee Marathi | Nilesh Mohrir

Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics from Zee Marathi TV Serial.
Film/Serial/Album:    Julun Yeti Reshimgaathi
Music by:    Nilesh Mohrir
Lyrics by:    Ashwini Shende
Singer(s):    Swapnil Bandodkar, Nihira Joshi-Deshpande
Music on:    Zee Marathi

Julun Yeti Reshimgathi Song Lyrics in Marathi

मुक्याने बोलले… गीत ते जाहले
स्वप्‍नं साकारले पहाटे पाहिले…
नाव नात्याला काय नवे?
वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला… आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी…
आपुल्या रेशीमगाठी…
उन्हाचे चांदणे उंबर्‍यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले?
खेळ हा कालचा.. आज कोण जिंकले?
हरवले कवडसे.. मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे?
जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला… मी तुजसाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी…
आपुल्या रेशीमगाठी…

Leave a Comment

close