बाळाला झोप का ग येत नाही… अंगाई Balala Zop Angai Song Lyrics | Ekda Kay Zala

सुनिधि चौहान यांनी मराठीत गायलेली पहिली अंगाई… बाळाला झोप का गं येत नाही…

Balala Zop Ka ga Yet Nahi Angai Song Credits:
Movie – Ekda Kay Zala
Music – Dr.Saleel Kulkarni
Lyrics – Sandeep Khare
Singer – Sunidhi Chauhan

अंगाई Balala Zop Angai Lyrics

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

निजली रात निजे चांदोबाही
बाळाला झोप का ग येत नाही
सांगता सांगता माझी दमली कहाणी
मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी
गुणगुण करतांना शिणली अंगाई

धावुनिया तुझ्यापाठ दिस गेला सारा
घरभर सारा तुझ्या खेळाचा पसारा
मागितले जे जे तुला दिले मी आणून
सारे देता येते नीज आणावी कुठून ?
ज्योत जीवाची जीवाने का रे उजळत नाही ?

नको दचकू असा मी कुठे जात नाही
बाळ जागे आणि कधी निजते का आई ?
फार फार भागलास आता घे विसावा
सारा सारा शिणवटा मिटू मिटू यावा
तुझे सोसणे हे मला सोसवत नाही

close