Ashtavinayaka Tuza Mahima Kasa Lyrics
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
गणपती दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू आता काय सांगू
डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी
ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा
गणपती तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर
ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवाल झालं
टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती गणपती गं चौथा गणपती
बाई रांजणगावचा देव महागणपती
दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती
गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
बाई रांजणगावचा देव महागणपती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती पाचवा पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर बाई लांब रुंद आहे मूर्ती
जडजवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरती हो सारा बघून सोहळा
चारीबाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
ओझरचा इघ्नेश्वर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडमंदी कोरलाय भक्तिभाव
रमती इथं रंकासंगती राव हे जी
खडकांत केलं खोदकाम दगडांत मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं, दगडांत भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
अन् गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगड माती रूप देवाचं लेण्याद्री जसा
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
सातवा गणपती राया
महड गावाची महसूर
वरद विनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी
नक्षी नागाची कळसाच्या वरं
सपनात भक्ताला कळं
देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं
त्यानं बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदिदेव तू बुद्धिसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख
सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे
कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती
देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया