करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता – Karvirpurvasini Survarmunimata
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥
कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तुं स्थुलसुक्ष्मी ॥ धृ. ॥
मातुलिंग गदायुत खेट्क रविकिरणी । झळके हाटकवादी पीयुषरसपाणी ॥
माणिकदशना सुरंगवसना म्रुगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ २ ॥
तारा शक्ती अगम्या शिवभजकां गौरी ॥ सांख्य म्हण्ती प्रकृती निर्गुण निर्धारी ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥
अमृतभरिते सरितें अघदुरितें वारी ॥ मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ॥
वारी मायापटल प्रणमत परीवारीं । हे रूप चिद्रुप दावी निर्धारी ॥ ४ ॥
चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥
पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥