आरती: लोलो लागला अंबेचा Lolo Lagla Ambecha – Devi Bhakti Geet – Aarti

लोलो लागला अंबेचा Lolo Lagla Ambecha – Devi Bhakti Geet

लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।

प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी।
कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी।
अंती नेतील हे यमदुत। न ये संगे कोणी।
निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी।। लोलो।।१।।

पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर।
नयनी देखिला आकार। अवघा तो ईश्वर।
नाही सुख – दुःख देहाला कैचा अहंकार।
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार।। लोलो।।२।।

ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी।
निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी।
लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेशवाणी।
देखिला भवानी जननी त्रैलोक्यपावनी।। लोलो।।३।।

गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा।
दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा।
आहं सोहं से उदो उदो बोलली चारी वाचा।।। लोलो।।४।।

पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत।
दोघे भोपे भट।
जेथे मोवाळे विंजाळे प्रणीता पाणी लोट।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ।।५।।

देवीची गाणी – आरती, जोगवा, स्तोत्र, गोंधळ आणि चित्रपट गीत

जय शारदे वागीश्वरी

माझी रेणुका माउली

–  दुर्गे दुर्गट भारी

उदो बोला उदो

छंद तुझा लागला

लोलो लागला अंबेचा

माहूर गडावरी गं तुझा वास

आई भवानी तुझ्या कृपेने

लख्ख पडला प्रकाश

घे लल्लाटी भंडार

गोंधळ

बया दार उघड – आदिशक्ती भवानी स्तोत्र

रेणुका माता आरती

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता

दुर्गा कवच

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता – Karvirpurvasini Survarmunimata – Devichi Aarti

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता – Karvirpurvasini Survarmunimata

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥
कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तुं स्थुलसुक्ष्मी ॥ धृ. ॥
मातुलिंग गदायुत खेट्क रविकिरणी । झळके हाटकवादी पीयुषरसपाणी ॥
माणिकदशना सुरंगवसना म्रुगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ २ ॥
तारा शक्ती अगम्या शिवभजकां गौरी ॥ सांख्य म्हण्ती प्रकृती निर्गुण निर्धारी ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥
अमृतभरिते सरितें अघदुरितें वारी ॥ मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ॥
वारी मायापटल प्रणमत परीवारीं । हे रूप चिद्रुप दावी निर्धारी ॥ ४ ॥
चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥
पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥

close