श्री स्वामी समर्थ महाराज आरती, स्तोत्र नित्य सेवा दिंडोरी प्रणित – Shree Swami Samarth Aarti Stotra Nitya Seva Dindori Pranit
श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती स्तोत्र नित्य सेवा दिंडोरी प्राणित प्रमाणे आपण इथे वाचू शकता.
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
भुपाळी
जागृत होई आत्मयारामा । अनामा सच्चित सुखघनधामा ।
गुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी ।। धृ ।।
ओँकारे तुज सत् ओळखती । दीप्तिरूप अससी गायत्री ।
अनंत नारायण यदुपति । जन उध्दरती या नामे ।। १ ।।
जगत् अनादि खेळ सुरू झाला । अहंज्ञान जीवाभ्रम झाला ।
विसरुनी गेला स्व-स्वरूपाला । षड्ररिपुसंगे सुखदुःखी ।। २ ।।
ही अहंनशा अतराया लीना । ज्ञानामृत पाजाया ।
विधि हरिहरा ऐक्य पावुनिया । दत्तात्रेया अवतरशी ।।३।।
पाहुनिया दुर्मन दुर्बल जना । कळवळूनि ये प्रेमाचा पान्हा ।
स्वामी समर्थ सदगुरुराणा । माय आम्हा हदयी धरिसी ।। ४ ।।
माये प्रेमेँ जागृत केले । क्षुंधेने लेकरु व्याकुळ झाले ।
पान्हा चोरिसी तुज न भले । भ्रांति दैत विस्मृति नाशी ।। ५ ।।
जागृत होई आत्मयारामा । अनामा सच्चित सुखघनधामा ।
गुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी ।।
————————————————————————————————
ध्यान व स्मरण
ब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं | द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्व मत्स्यादिलक्ष्यम् ||
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतमं | भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि ||
॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥
॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥
श्रीमन्-महा गणाधिपतये नम: l श्री कुलदेवतायै नमः l
श्री गुरवे नम: l श्री स्वामी समर्थ महाराजाय नम: l
सकाळी
॥ श्री गणपती आरती ॥
ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l
औट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll
बिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l
योगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll
पीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l
उकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll
लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l
अनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll
॥ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ॥
जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥
अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥
लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥
यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥
समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥
जाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥
इतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥
जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥
॥ श्री दत्तात्रेय आरती ॥
जय अनसूयात्मज श्री दत्तात्रेया आरती अवधूता l
सिद्ध मुगुटमणि ब्रह्माज्ञानी सुरनरभ्रमहर्ता ll धृ.ll
मदनमनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता l
चरणि पादुका कंठी मेखला जटामुकुट माथा ll १ ll
पुराण पुरषोंत्तमा,त्वां धरिले अगणित अवतारा l
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दातारा ll २ ll
मूढमति अति पतित दीन परि आलो शरण तुला l
कृपामृते निजस्वरूपे रमवुनि उद्धरी दासाला ll ३ ll
संध्याकाळी
॥ श्री गणपती आरती ॥
ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l
औट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll
बिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l
योगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll
पीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा l
उकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll
लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l
अनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll
॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥
आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था l
स्वरूप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा – दिव्यकाय नाथा ll धृ.ll
हृदय निरांजनी शुद्ध प्रेमधृति भवाच्या वाती l
भजनानंद प्रकाश देउनी उजळल्या ज्योती ll १ ll
सर्वस्वापर्ण नैवधाशी ठेविलेचि पुढती l
सन्मति, सदधृति, सतकृती सदगति प्रसाद धा हाती ll २ ll
॥ श्री दत्तात्रेययांची आरती ॥
आरती ओवाळू गुरुसी l ब्रह्मा विष्णु महेशासी ll ध्रु.ll
दिधले आत्मदान जगति l म्हणवुनि श्रीदत्त तुज म्हणती ll
ब्रह्मारूपे जग सृजसी l विष्णू तूचि प्रतिपाळिसी l
हर हरिसी भार उतरविसी l पार देऊनी आत्मज्ञान प्रणती l
किती तव स्मरणे जगी तरती ll १ ll आरती ओवाळू श्रीगुरूसी
निर्गुण चित्धन वस्तुसी l अत्नीअनसूयात्मज म्हणती l
लीला दावूनी उध्दरसी l मानवदेहा जरी धरिसी l
परि नससि देह, हाचि संदेह l हृदयी असूनि ही मूर्ती l
जाणीव लोपली अंधमती ll २ ll आरती ओवाळू श्रीगुरूसी
॥ श्री नारायणाची आरती ॥
ओवाळू नारायण l शुद्ध ज्योती पंचप्राण ll धृ.ll
शामलांग वत्सलांछन l शंख करी जाण l
वीजयंती पीतवसन l गदा शोभे सुदर्शन ll १ ll
मुगुट कौस्तुभरत्न l मकराकृत कुंडल शुभ कर्ण l
हृदय सिंहासनी l विराजला जगज्जीवन ll २ ll
हरपवी देहभान l नित्य घडो तव चिंतन l
दास तव चरणी लीन l जावी याच देही ध्यान ll ३ ll
॥ श्री गायत्री मातेची आरती ॥
जय देवी जय देवी जय गायत्री माते l
सदभावे ओवाळू जय प्रणवातीते ll धृ.ll
अनादी अनंत अतकर्य माये तव लीला l
स्वेच्छेने उपजविले विधी हरी शंभूला l
विधी सृजी जग हरी पोषी हर संहाराला l
प्रेरिसी योगमाये न कळे कवणाला ll १ ll
पांचामुखी पंचतत्वे निर्मियली l
पंचीकरणे विविध सृष्टी रचियेली l
अहंभावे तया स्फुरवूनी कृती केली l
माते तुज न स्तविती त्यांची मति भ्रमली ll २ ll
गाता तुज तरति म्हणूनि गायत्री नांव l
भुक्ति मुक्ती साधती न भवभया ठाव l
सत्वातीता ब्रह्म रुपिणी हा भाव l
धरिति जे ज्ञाने त्या नच दुखः वाव ll ३ ll
आदिमाये तुते विसरले लोक l
धर्म हानि होईल पडला हा धाक l
ग्रासुनि दैन्ये भ्रमुनि नुरला विवेक l
स्मरता तुजला अनुदिनी सकलही हो पाक ll ४ ll
त्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुगुटाते l
वरदाभय चक्र गदा कपाल शंखाते l
द्वीपद्म अंकुश कश कर कमलासनस्थिते l
मोह निवारून माते उध्दरी आम्हांते ll ५ ll
॥ श्री शंकराची आरती ॥
जय शिव ॐकारा, प्रभू हर शिव ॐकारा । ब्रह्मा विष्णु सदाशिव
ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्द्धांगी दारा ॥
ॐ हर हर महादेव ॥१॥
एकानन चतुरानन पंचानन राजे । शिव पंचानन राजे,
हंसासन गरूड़ासन, हंसासन गरूड़ासन, वृषवाहन साजे ॥
ॐ हर हर महादेव ॥२॥
दोयभुज चार चतुर्भुज, दशभुज ते सोहे । शिव दशभुज ते सोहे
तीनोरूप निरखता, तीनोरूप निरखता, त्रिभुवनजन मोहे ॥
ॐ हर हर महादेव ॥३॥
अक्षमाला वनमाला रूंडमाला धारी । शिव रूंडमाला धारी
चंदनमृगचंदा, चंदनमृगचंदा भाले शुभकारी ॥
ॐ हर हर महादेव ॥४॥
श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे । शिव व्याघ्रांबर अंगे
सनकादिक प्रभुतादिक, सनकादिक प्रभुतादिक, भूतादिक संगे ॥
ॐ हर हर महादेव ॥५॥
लक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे । शिव सावित्री संगे
पारबती अर्धांगे, पारबती अर्धांगे, शिरी जटा गंगे
ॐ हर हर महादेव ॥६॥
करमा एक कमंडलु चक्र त्रिशूलधर्ता । शिव चक्र त्रिशूलधर्ता
जगकर्ता जगभर्ता, जगकर्ता जगभर्ता, जग पालनकर्ता
ॐ हर हर महादेव ॥७॥
काशी में विश्वनाथ विराजे, नंदो ब्रह्मचारी । शिव नंदो ब्रह्मचारी
नितप्रति भोग लगावत, नितप्रति भोग लगावत, महिमा अतिभारी ॥
ॐ हर हर महादेव ॥८॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव, जानत अविवेका । शिव जानत अविवेका
प्रणवाक्षर ॐ मध्ये, प्रणवाक्षर ॐ मध्ये, ये तीनों एका ॥
ॐ हर हर महादेव ॥९॥
त्रिगुणाजीकी आरती जो कोई नर गावे । शीव जो कोई नर गावे
कहे शिवानंद स्वामी, कहे शिवानंद स्वामी, सुख संपत्ती पावे ॥
ॐ हर हर महादेव ॥१०॥
मंत्र पुष्पांजली
पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा
ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा l
मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी l
देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥
आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा l साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा l
स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा l
दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥
धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही l
तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि l
भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा
होई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥
विधीहरिहर हे एकरूपे मिळाले l परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले l
अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं l
तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥
परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा l
लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा l
ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा l
अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥
ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा l
ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा l
भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा l
गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥
ll श्री स्वामी समर्थ महाराज जयजयकार ll
ॐ श्री सद्गुरु अक्कलकोटनिवासी राजाधिराज
योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय l
अनंतकोटि ब्रम्हांडनायक, भक्तवत्सल, भक्ताभिमानी
श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ l
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त l
ॐ श्री गायत्रीमाता की जय l
ॐ श्री गुरु महाराज की जय l
|| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||
सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।
ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।
ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥
अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥